२ अपत्यांचा नियम कालबाह्य, घटत्या जन्मदरावर सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण; म्हणाले, फेरविचाराची गरज

SC on Two Child Policy देशातील जन्मदर सातत्याने कमी होत असल्याने लोकसंख्या नियंत्रणासाठी तयार केलेल्या अशा नियमांची उपयुक्तता आता संपल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
Supreme Court

Supreme Court

ESakal

Updated on: 

भारतात दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवता येत नाही. या अपात्र ठरवणाऱ्या नियमांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केलीय. महाराष्ट्रातल्या मंगला भीमराव इंगळे यांना तिसरं अपत्य झाल्यानं सरपंच पदासाठी अपात्र ठरवलं होतं. यावर सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने जन्मदर कमी होत असल्याचा उल्लेख केला. देशातील जन्मदर सातत्याने कमी होत असल्याने लोकसंख्या नियंत्रणासाठी तयार केलेल्या अशा नियमांची उपयुक्तता आता संपल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या नियमांचा पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

Loading content, please wait...