'जहांगीरपुरीतील कारवाई तत्काळ थांबवा', SC चा दिल्ली महापालिकेला दणका

Supreme Court Halts Jahangirpuri Demolition | Jahangirpuri Violence
Supreme Court Halts Jahangirpuri Demolition | Jahangirpuri Violenceesakal

नवी दिल्ली : हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे भाजपशासित महापालिकेकडून आज सकाळी साडेनऊ वाजतापासून बुलडोजरने कारवाई करण्यात आली आहे. येथील अतिक्रमणाविरोधात ही कारवाई असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण, आता सर्वोच्च न्यायालयाने भाजपशासित महापालिकेला दणका देत ही कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (Supreme Court on Jahangirpuri Violence Case)

Supreme Court Halts Jahangirpuri Demolition | Jahangirpuri Violence
जहांगीरपुरीत बुलडोजर, दिल्ली महापालिकेची दंगलग्रस्त भागात कारवाई

दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला. इथं दगडफेक देखील करण्यात आली होती. तसेच गोळीबार देखील झाला. यामध्ये आठ पोलिस कर्माचाऱ्यांसह काही नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच परवानगी नसताना मिरवणूक काढल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादरम्यान दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही महापौरांना पत्र लिहून जहांगीरपुरीतील 'दंगलखोरांची' बेकायदा बांधकामे ओळखून ती पाडण्याची मागणी केली होती. या पत्राची प्रत पालिका आयुक्तांनाही पाठवण्यात आली आहे. त्यानंतर दिल्ली महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. त्यानंतर जहांगीरपुरीतील गरीबांचे घर बुलडोजरने पाडण्याचे काम सुरू झाले होते. याठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले होते.

आता सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईला पुढील सुनावणीपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत. उद्या म्हणजेच गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. गुरुवारपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जहाँगीरपुरी परिसरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची आम्हाला नुकतीच माहिती मिळाली. आधी आदेश वाचून त्यानुसार कार्यवाही करू, असं उत्तर दिल्ली महापालिकेचे आयुक्त संजय गोयल यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com