

Supreme court
sakal
Supreme Court on Motor Accident Compensation: रस्ते अपघातातील पीडितांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलाय. या योजनेत विमा असलेल्या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, विमा नसलेल्या वाहनांमुळे झालेल्या अपघातातील पीडितांना या योजनेतून बाहेर का ठेवलं असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. तसंच या योजनेचा प्रचार आणि प्रसार करा अशा सूचनाही दिल्या आहेत.