

Supreme court
sakal
कॅन्सरच्या उपचारासाठी आवश्यक औषधांच्या किंमतीत असलेल्या फरकावरून नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने हा भरदिवसा दरोडा असल्याचं म्हटलंय. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठासमोर एका याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत जे औषध रिटेलरला २७०० रुपयांना मिळतं त्यावर एमआरपी तब्बल २७ हजार रुपये छापण्यात येत असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलं.