सीबीएसई पेपरफुटी प्रकरण: सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

नवी दिल्ली : सीबीएसई पेपरफुटी प्रकरण आणि फेरपरीक्षेच्या निर्णयाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.

बोर्डाकडून दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता; तसेच संचालक मंडळ बरखास्त करण्याचीही मागणी यात करण्यात आली होती. 

न्या. एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्‍वरा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (ता. 1) या याचिकेवर सुनावणी झाली. बोर्डाने घेतलेल्या निर्णयाबाबत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

सामाजिक कार्यकर्ते संजॉय सचदेव यांनी ही याचिका केली होती. त्याच्या वकिलांनी सीबीएसई हे वैधानिक प्राधिकरण नसून फेरपरीक्षा घेण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला. तो अमान्य करण्यात आला. सीबीएसईने 25 एप्रिलला देशभरात बारावीच्या ईकॉनॉमिक पेपरची फेरपरीक्षा घेतली होती. 

Web Title: Supreme Court refuses demand for CBI inquiry in CBSE Paper Leak case