तेलतुंबडेंच्या अडचणीत भर; गुन्हा रद्द करण्यास नकार

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जानेवारी 2019

कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयानातूनही दिलासा मिळालेला नाही. तेलतुंबडेंविरोधातील गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता.

नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयानातूनही दिलासा मिळालेला नाही. तेलतुंबडेंविरोधातील गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता.

तेलतुंबडे यांना कारवाईपासून देण्यात आलेले संरक्षण मात्र, न्यायालयाने 4 आठवड्यांपर्यंत कायम ठेवले आहे. तपासाची व्याप्ती प्रचंड वाढली असल्यामुळे कार्यवाही रद्द करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी प्रथम मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती.

Web Title: Supreme Court Refuses To Quash Fir Against Anand Teltumbde