'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावरील बंदीच्या मागणीवर सुप्रीम कोर्टानं दिला 'हा' निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court
'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावरील बंदीच्या मागणीवर सुप्रीम कोर्टानं दिला 'हा' निर्णय

'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावरील बंदीच्या मागणीवर सुप्रीम कोर्टानं दिला 'हा' निर्णय

नवी दिल्ली : Why I Killed Gandhi : 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टानं आज निर्णय दिला आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला आहे. तसेच याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्यास सुचवलं आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनी ३० जानेवारी रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता. (Supreme Court Refuses To Entertain Plea To Ban Why I killed Gandhi Movie Streaming)

सिकंदर बहल यांनी अधिवक्त अनुज भंडाली यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठानं सुनावणीला नकार दिला. याचिकाकर्त्यानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचं ओटीटी तसेच सोशल मीडियावर प्रदर्शन होऊ नये. यावर खंडपीठानं म्हटलं की, नागरिक म्हणून याचिका कर्त्याची चिंता गंभीर आहे. पण यातून मुलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलंन नाही. त्यामुळं यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात हायकोर्टात जावं, अशी सूचना केली.

हेही वाचा: विद्यार्थ्यांनी चर्चा करावी, आंदोलन हे शेवटचं पाऊल - वर्षा गायकवाड

व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचं दिग्दर्शन अशोकुमार त्यागी यांनी केलं आहे. तर त्यात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा एकूण कालावाधी ४५ मिनिटांचा आहे. कोल्हे यांनी यात गोडसेची भूमिका साकारल्यानं त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. याबाबत कोल्हे यांनी या भूमिकेबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना ती केवळ कलाकृती असून गोडसेच्या विचारधारेशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Supreme Court Refuses To Entertain Plea To Ban Why I Killed Gandhi Movie Streaming

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme CourtDesh news
go to top