न्यायाधीश कर्नान यांना दिलासा नाही

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

सध्या तरी कर्नान तुरुंगातच राहणार आहेत. या वेळी सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाविरोधी तोंडी विनंती स्वीकारत नसल्याचे स्पष्ट केले

नवी दिल्ली - कोलकता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्नान यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास आणि शिक्षेला स्थगिती देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सध्या कोणताही अंतरिम आदेश देण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी कर्नान तुरुंगातच राहणार आहेत. या वेळी सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकालाविरोधी तोंडी विनंती स्वीकारत नसल्याचे स्पष्ट केले.

न्यायाधीश कर्नान यांना मानहानीच्या खटल्यात 6 महिन्यांची शिक्षा झाली आहे. चाळीस दिवस फरारी राहिल्यानंतर कर्नान यांना अटक करण्यात आली. कर्नान यांनी जामिनासाठी सोमवारी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, या खटल्याची सुनावणी 7 न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठाने केलेली असताना आणि 6 महिन्यांची शिक्षा सुनावलेली असताना दोन न्यायाधीशांचे पीठ कशी सुनावणी करू शकते.

Web Title: Supreme Court refuses urgent hearing to Justice Karnan seeking bail