Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Supreme Court Rejects Lethal Injection Plea : न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे या विषयावर विविध चर्चांनाही उधाण आले आहे.
Supreme Court Rejects Lethal Injection Plea

Supreme Court verdict on hanging and lethal injection for death penalty in India

esakal

Updated on

मृत्युदंडाची शिक्षा देताना फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा विचार करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सध्या भारतात फाशीच्या माध्यमातून मृत्युदंड देण्याची पद्धत कायदेशीर आणि घटनात्मकदृष्ट्या लागू आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे या विषयावर विविध चर्चांनाही उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com