
सुप्रीम कोर्टाने धर्मांतरणाबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. मद्रास हायकोर्टाचा आदेश कायम राखत हा एका महिलेला अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. जर कोण फक्त आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही आस्थेशिवाय धर्मांतरण करत असेल तर हे आरक्षणाच्या धोरणाच्या आणि सामाजिक भावनेच्या विरोधात असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. महिलेने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. तिने एका उच्च श्रेणीच्या लिपिक पदाची नोकरी मिळवण्यासाठी हे प्रमाणपत्र मागितले होते. याचिकाकर्ती महिला ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मातील अनुसुचित जातीत सामिल झाली आहे.