
सुप्रीम कोर्टाने वेगाने आणि बेफिकिरपणे वाहने चालवणाऱ्या चालकांसाठी एक मोठा निर्णय दिला आहे. रस्ते अपघातात स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोर्टात धाव घेणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.