Supreme Court: पती दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये? पत्नीने मागितले कॉल रेकॉर्ड; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court Upholds Disclosure of Call Records and Hotel Stay Details in Adultery Divorce Case : व्यभिचाराशी संबंधित घटस्फोटाच्या प्रकरणात गोपनीयतेचा अधिकार सांगून कॉल रेकॉर्ड आणि हॉटेलमधील वास्तव्याची माहिती लपवता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
Supreme Court
Supreme Court

sakal

Updated on

नवी दिल्ली : संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मिळालेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आधार घेत पती किंवा पत्नी आपल्या जोडीदारापासून मोबाईल कॉल रेकॉर्ड किंवा हॉटेलमधील वास्तव्याची माहिती लपवू शकत नाही, विशेषतः व्यभिचार सिद्ध करण्यासाठी अशा माहितीची आवश्यकता असल्यास, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने अशी माहिती न्यायालयात सादर करण्यास विरोध करत ती गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्याचा दावा केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com