BS-IV वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; वाहनधारकांसह कंपन्यांना दणका

supreme court
supreme court

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बीएस IV वाहनांच्या खरेदीबाबत मोठा निर्णय दिला आहे. याआधी 27 मार्च 2020 ला दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतला आहे. आता 31 मार्चनंतर विक्री करण्यात आलेल्या वाहनांची नोंदणी होणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. BS-IV वाहनांची विक्री आणि नोंदणीच्या परवानगीबाबत झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइन डीलर असोसिएशनला फटकारलं आहे. 

देशात ठरलेल्या संख्येएवढीच वाहनं विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कार निर्मिती कऱणाऱ्या कंपन्यांनी याचा गैरफायदा घेतला. यासाठी आधीचा आदेश मागे घेत आहे. आता पुढची सुनावणी 23 जुलैला होईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. 

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आता वाहन खरेदी करणाऱ्यांचे काय होणार असा प्रश्न पडला आहे. कारण 31 मार्चनंतर खरेदी केलेल्या बीएस 4 गाड्यांची नोंदणी होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने याआधी 27 मार्चला दिलेला आदेश मागे घेतला आहे. म्हणजेच जर विक्री 31 मार्चच्या आधी झाली असेल तरच रजिस्ट्रेशन होणार आहे. डीलरने E vahan पोर्टलवर डेटा अपलोड केला नसेल तर विक्री झाली आहे असं मानलं जाणार नाही. त्यामुळे याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. 

बीएस IV वाहनांच्या विक्रीसाठी कंपन्यांना दहा दिवस अधिक वेळ देण्याचा निर्णय 27 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. लॉकडाऊनमुळे विक्री करण्यासाठीस 10 दिवसांचा वेळ मिळाला मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आम्ही दिलेल्या आदेशाचा गैरवापर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने कंपन्यांना 1 लाख 5 हजार गाड्यांची विक्री करण्याची परवानगी दिली होती. मात्र कंपन्यांनी 10 दिवसात 2 लाख 55 हजार गाड्या विकल्या.

बीएस म्हणजे भारत स्टेज. याचा संबंध गाडीतून उत्सर्जित होणाऱ्या वायुशी आहे. भारत स्टेज उत्सर्जन स्टँडर्ड हे विशेषत: दुचाकी आणि चारचाकीसाठी आहे. या गाड्यांमधून होणाऱ्या वायु उत्सर्जनाबाबत पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ ठरवतं. 

भारत सरकारने 2000 साली बीएस उत्सर्जन निकषांना सुरुवात केली होती. भारत स्टेज म्हणजेच भारत स्टँडर्ड नियम हे युरोपीय नियमांवर आधारीत आहे. ही वाहने कमी प्रदुषण करतात. नव्या बीएस 6 वाहनांच्या बोनेटमध्ये जास्त जागा असेल. नायट्रोजनच्या ऑक्साइडला फिल्टर करण्यासाठी सिलेक्टिव्ह कॅटलिटिक रिडक्शन तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये बंधनकारक असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com