

CJI Surya Kant
esakal
नवी दिल्ली: विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवरून सर्वोच्च न्यायालयात सोमवारी चर्चा सुरू झाली आणि लगेचच वातावरण गरम झाले. बिहारसह अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या या विशेष प्रक्रियेविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी होत असताना, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, बिहारमध्ये मतदारांना पाठवण्यात आलेल्या सूचना केंद्राकडून तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण यंत्रणेवर शंका निर्माण होत आहे.