

नवी दिल्ली: उच्च शिक्षण क्षेत्रात समानता वाढवण्यासाठी आणलेल्या UGC च्या २०२६ च्या नव्या नियमांना सुप्रीम कोर्टाने आज मोठा धक्का दिला आहे. या नियमांना तात्पुरती स्थगिती देत कोर्टाने जुने नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. याचिकाकर्त्यांनी या नियमांमुळे सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याला कोर्टाने मान्यता दिली. या निर्णयामुळे शिक्षण संस्थांमध्ये सध्या तरी जुने नियमच लागू राहणार आहेत.