Supreme Court Acquits Railway TTE
ESAKAL
रेल्वेत तिकीट तपासताना टीटीईने ५० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता तब्बल ३७ वर्षांनी निकाल आला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने टीटीईला निर्दोष मुक्त केलं आहे. मात्र, हा निकाल ऐकायला हा टीटीई आता या जगात नाही. काही वर्षांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी न्यायालयाने अखेरचा निकाल देत त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे.