

sakal
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता आठवड्यातून दोन दिवस पूर्णपणे व्हर्च्युअल पद्धतीने खटल्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनामुळे घेण्यात आला असल्याचे समजते.