
Supreme Court on Waqf Amendment Act
sakal
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाकडून आज यातील काही तरतुदींना स्थगिती देण्यात आली आहे. जोपर्यंत या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत ही स्थगिती राहणार असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. सरन्यायाधीश बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.