

Supreme Court
sakal
न्यायव्यवस्थेवर टीका करण्याची मुभा आहे, मात्र ती मर्यादेत आणि पुराव्यानिशी असावी, असा स्पष्ट संदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर गंभीर आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा मौलिक मुद्दा अधोरेखित केला.