

Supriya Sule
esakal
महिला आरक्षण विधेयकासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे. सरकार सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ही विधेयके मांडण्याची शक्यता आहे. या विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार उद्धव ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे वृत्त समोर आले होते, मात्र यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अमित शहा आणि किरेन रिजिजू यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.