esakal | भाजपसोबत गेलेल्या नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक; चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

sule

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी एक ट्विट करत चौटाला यांचे अभिनंदन केल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

भाजपसोबत गेलेल्या नेत्याचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक; चर्चांना उधाण

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी एक ट्विट करत चौटाला यांचे अभिनंदन केल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हरियाणात भाजपबरोबर सत्तास्थापनेची गणितं जुळवत उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या दुष्यंत चौटाला यांचं सुप्रिया सुळे अचानक कशासाठी अभिनंदन करत आहेत हे न उमजून अनेकांनी त्यांना ट्विटरवर प्रश्न केले आहेत. महाराष्ट्रात भाजपविरोधात शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकवटले असताना भाजपसोबत युती केलेल्या नेत्याचे सुळेंनी कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राणे यांना पनवती म्हणणे अयोग्य

सुळे यांच्या ट्वीटमध्ये इतर कुठलाही तपशील नाही. फक्त एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये त्या जननायक जनता पार्टीच्या दुष्यंतसिंह चौटाला यांच्यासोबत आहेत. हरियाणा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातल्या निवडणुकीबरोबरच झाली. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरीही, एकत्र निवडणूक लढलेले हे पक्ष विभक्त झाले आणि महाराष्ट्रात सत्तास्थापनेची पोकळी निर्माण झाली. कुठल्याच एका पक्षाला बहुमत नव्हतं. तशीच परिस्थिती हरियाणात होती.

काँग्रेस आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेसाठी चढाओढ होती. महाराष्ट्रात जसं सत्तास्थापनेची दोरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती होती आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवणारा पक्ष सत्ता स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती होती. तशीच हरियाणात दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाचं स्थान होतं. फक्त 10 जागा मिळवूनसुद्धा दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरले.