PM Suraj Portal : पीएम-सूरज पोर्टल सामाजिक प्रगती आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने उपयुक्त : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी आयुष्मान हेल्थ कार्ड, पीपीई किटचे वाटप करण्यात आले
PM Suraj Portal
PM Suraj Portalesakal

PM Suraj Portal :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पी.एम. सुरज पोर्टलचे पंतप्रधान सामाजिक प्रगती आणि रोजगार आधारित पी.एम.सुरज पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांच्या कल्याणासाठी योजना आखल्या गेल्या असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले.

या नव्या युगात वंचितांना प्राधान्य दिले गेले. कारण आता भारताने विकसित भारताची प्रतिज्ञा घेतली आहे. आपला देश आता विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. विकसित भारत बनण्याच्या दिशेने वेगवान गती देशाला प्राप्त झाली असल्याचेही ते म्हणाले.

PM Suraj Portal
Uttarakhand high court: 'गर्भवती महिलांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही', उत्तराखंड उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

उत्तराखंडमधील हरद्वार जिल्ह्यात असलेल्या ऋषीकुल आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सफाई कामगारांना पीपीई किटचे वाटप केले.

गरीब, मागास, आदिवासी, शेतकरी आदी सर्व घटकांची सरकारने काळजी घेतली असल्याचे ते म्हणाले. पीएम सूरज पोर्टलचा शुभारंभ या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आहे. जे नेहमीच उपेक्षित होते. एससी, ओबीसी आणि सफाई कामगारांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल, असेही ते म्हणाले.

PM Suraj Portal
Uttarakhand : PRD जवानांसाठी उत्तराखंड सरकारचे गिफ्ट, मासिक भत्त्यात केली वाढ, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

पंतप्रधानांनी नुकतीच ही रक्कम थेट डीबीटीद्वारे हस्तांतरित केली आहे. यासोबतच सेफ्टी टँक, गटार आदी साफ करताना सुरक्षेसाठी आयुष्मान हेल्थ कार्ड, पीपीई किटही देण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या विचाराना हाताला धरत पंतप्रधान नरेंद्र मोदीही जनतेचा विचार करत आहेत. लोकांच्या समतेच्या विचारांना आत्मसात करून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयत्न या मूळ मंत्राने अखंड कार्य केले जात आहे.

हा मंत्र आपण आत्मसात करून शोषित, वंचित, दलित आणि मागासलेल्या लोकांच्या कल्याणासाठी काम करू अशी प्रतिज्ञा या निमित्ताने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com