Court Suggestion to Rahul Gandhi: सूरत कोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर राहुल गांधींना दिला 'हा' सल्ला!

बदनामीच्या खटल्यासंदर्भातील राहुल गांधींची पुनर्विचार याचिका सूरत कोर्टानं गुरुवारी फेटाळली.
rahul Rahul gandhi noticed from Germany BJP aggressive Digvijay Singh tweet Criticism
rahul Rahul gandhi noticed from Germany BJP aggressive Digvijay Singh tweet Criticism sakal

नवी दिल्ली : बदनामीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा न्यायालयानं नुकतंच राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राहुल गांधींनी याच कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टानं आज फेटाळली. पण याचिका फेटाळताना कोर्टानं राहुल गांधींना एक सल्लाही दिला आहे. (Surat Court Suggestion to Rahul Gandhi after rejected review petition)

सूरत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रॉबिन मोगेरा यांनी असंही निरीक्षण नोंदवलं की, राहुल गांधींच्या तोंडून आलेले कोणतेही बदनामीकारक शब्द पीडित व्यक्तीला मानसिक त्रास देण्यास पुरेसे आहेत आणि या प्रकरणात, 'मोदी' आडनाव असलेल्या व्यक्तींची चोरांशी तुलना केल्यास नक्कीच मानसिक त्रास होईल. भाजप आमदार तक्रारदार पूर्णेश मोदी यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली.

rahul Rahul gandhi noticed from Germany BJP aggressive Digvijay Singh tweet Criticism
Bilawal Bhutto in Goa: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गोव्याच्या दौऱ्यावर! जाणून घ्या डिटेल्स

दरम्यान, कोर्टाच्या निकालावर राहुल गांधींच्या वकिलानं घेतलेला आक्षेपही कोर्टानं फेटाळून लावला. हा वाद खटल्याच्यावेळी उपस्थित केला गेला नाही आणि त्यामुळं असा आक्षेप घेता येणार नाही, असंही कोर्टानं म्हटलं आहे. कोर्टानं असंही नमूद केलं की, न्यायदंडाधिकारांनी गांधींना साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची सर्व संधी दिली होती आणि म्हणूनच, ट्रायल कोर्टानं त्यांच्यावर अन्याय केला असा केलेला युक्तिवाद चुकीचा होता, असंही कोर्टानं यावेळी म्हटलं.

rahul Rahul gandhi noticed from Germany BJP aggressive Digvijay Singh tweet Criticism
Gautam Adani: शरद पवारांची 'ती' मुलाखत अन् अदानींच्या भेटीने चर्चांना उधाण

कोर्टानं राहुल गांधींना दिला सल्ला

गांधींना जास्तीत जास्त शिक्षेबाबतचा युक्तिवाद करताना कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलं की, राहुल गांधी हे सामान्य व्यक्ती नव्हते ते विद्यमान खासदार होते. सार्वजनिक जीवनाशी निगडीत होते आणि त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही शब्दाचा सर्वसामान्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळं त्यांनी शब्द जपून वापरावेत. गांधींसारख्या व्यक्तीकडून उच्च नैतिकतेचा दर्जा अपेक्षित आहे, त्यांना ट्रायल कोर्टानं ठोठावलेली शिक्षा कायद्याने मान्य होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com