सूरत रेल्वेस्थानकाची 'सुरत' बदलणार 

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

नवी दिल्ली : रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत गुजरातमधील सूरत स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून, तेथे जागतिक दर्जाच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अशा सुविधा उपलब्ध होणारे सूरत देशातील दुसरे; तर गुजरातमधील गांधीनगरनंतरचे दुसरे स्थानक ठरेल. यापूर्वी देशातील हबीबगंज स्थानकावर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता.

देशभरातील 800 स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा भारतीय रेल्वेस्थानक पुनर्विकास महामंडळाचा मानस आहे. 

रेल्वे मंत्रालयाच्या एक लाख कोटी रुपयांच्या स्थानक पुनर्विकास योजनेंतर्गत सूरत स्थानकाचा कायापालट करण्यात येणार असून, तेथे विमानतळांवरील सुविधांसारख्या अनेक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सूरत महानगरपालिका आणि गुजरात राज्य परिवहन महामंडळाचा संयुक्त उपक्रम असलेल्या एसआयटीसीओने या स्थानकावर मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्टेशन हब विकसित करण्यासाठी पात्रता प्रस्ताव मागवले आहेत. या हबच्या उभारणीचे काम या वर्षी सुरू होईल. या कामासाठी अंदाजे पाच हजार कोटी रुपये खर्च होणार असून, हे काम 2020 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

असा होणार कायापालट 
- अपेक्षित खर्च : 5000 कोटी रुपये 
- स्थानकाचे क्षेत्रफळ : 3,19,700 चौरस मीटर 
- 900 वाहनांसाठी पार्किंग स्पेस 
- रोजच्या प्रवाशांची अपेक्षित संख्या : 3,49,684 

Web Title: Surat Railway station will go under development work