"भारत माता की जय' न म्हणणारे पाकिस्तानी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सुरेंद्र सिंह यांनी वक्तव्य केले त्या वेळी स्थानिक खासदार भरत सिंहही उपस्थित होते, असे सांगितले जाते. सुरेंद्र सिंह यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यापूर्वी त्यांनी म्हटले होते, की भारत एकदिवस हिंदू राष्ट्र असेल आणि हिंदुसंस्कृतीला मानणारेच मुस्लिम देशात राहू शकतील

बल्लिया (उत्तर प्रदेश) - आपल्या वक्तव्यांनी कायम वादग्रस्त ठरलेले भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी रविवारी एका जाहीर सभेत बोलताना, भारत माता की जय म्हणायला दचकणाऱ्या लोकांना मी पाकिस्तानी मानतो, असे वक्तव्य केले.

सुरेंद्र सिंह यांनी वक्तव्य केले त्या वेळी स्थानिक खासदार भरत सिंहही उपस्थित होते, असे सांगितले जाते. सुरेंद्र सिंह यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यापूर्वी त्यांनी म्हटले होते, की भारत एकदिवस हिंदू राष्ट्र असेल आणि हिंदुसंस्कृतीला मानणारेच मुस्लिम देशात राहू शकतील.

सुरेंद्र सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्याच सरकारविरुद्धही आवाज उठवला होता. ते म्हणाले होते, की उत्तर प्रदेशात केवळ सरकार बदलले आहे. बाकी काहीच नाही. जो गैरव्यवहार, भ्रष्टाचार समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षाच्या सरकारमध्ये होत होता, तो आत्ताही सुरूच आहे.

Web Title: surendra singh bjp