सर्जिकल स्ट्राइक शक्‍य : रावत

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पाकिस्तानने शांतता प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास भारताला प्रत्युत्तर देण्याचा हक्क असल्याने आणखी सर्जिकल स्ट्राइकची शक्‍यता नाकारता येणार नाही, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज स्पष्ट केले. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये पाकिस्तानच्या प्रतिसादाबाबत भारताने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

लष्कराच्या वार्षिक पत्रकार परिषदेत जनरल रावत यांनी विविध प्रश्‍नांवर उत्तरे दिली. "भारताला अद्यापही छुप्या युद्धाचा धोका असून, घुसखोरी आणि दहशतवादामुळे पुढील काही वर्षे तरी वाद कायम राहण्याची भीती आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संवाद असून दोन्ही सैन्यांना शांतता हवी आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने शांतता प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास सर्जिकल स्ट्राइकचा पर्याय भारतासमोर खुला आहे,' असे रावत म्हणाले.

देशातील धर्मनिरपेक्ष वातावरण कायम ठेवायचे असेल तर 1989 पूर्वीचे वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, असेही ते म्हणाले. 1989 नंतर दहशतवाद वाढल्यानंतर काश्‍मिरी पंडितांनी केलेल्या स्थलांतरांचा त्यांच्या या बोलण्याला संदर्भ असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: surgical strike possible, says rawat