आशिष मिश्रा यांनी केले आत्मसमर्पण; लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surrender by Ashish Mishra

आशिष मिश्रा यांनी केले आत्मसमर्पण; लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी हत्या झालेल्या मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याने आत्मसमर्पण (Surrender) केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून आठवडाभरात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. आशिष मिश्रा हे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आहे. आशिष मिश्रा यांची पुन्हा लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी केली आहे. (Surrender by Ashish Mishra)

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये शेतकरी (farmers) आंदोलनादरम्यान लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याची (Crushed) घटना घडली होती. यामध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर खुनासह अनेक गंभीर कलमांत गुन्हा दाखल करण्याबरोबरच तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आशिष मिश्रा यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

हेही वाचा: नवनीत राणांचा जनतेला प्रश्न; ...तर आम्हाला फाशी द्या

यानंतर १८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांचा जामीन रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत म्हटले की, पीडितांना सर्व स्तरांवर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात पीडितेला सुनावणीचा अधिकार नाकारला आहे. अनेक असंबद्ध तथ्य आणि न पाहिलेली उदाहरणे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता.

न्यायालयाने आशिष मिश्राला (Ashish Mishra) आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर फेरविचार करावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. यावेळी पीडितांचे वकील दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठासमोर चालवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती. असा आदेश देणे योग्य होणार नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले.

Web Title: Surrender By Ashish Mishra Departure To Lakhimpur Kheri Jail Crushed The Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Farmerashish mishra
go to top