Rana Couple VS Shivsena : नवनीत राणांचा जनतेला प्रश्न; ...तर आम्हाला फाशी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Is it a sin to read Hanuman Chalisa?

नवनीत राणांचा जनतेला प्रश्न; ...तर आम्हाला फाशी द्या

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसाचे (Hanuman chalisa) पठण करणार असल्याचे सांगितले. यानंतर राज्यात चांगलेच वातावरण तापले. काल राणा दाम्पत्यांना अटक केल्यानंतर रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर नवनीत राणा (Navneet rana) यांनी ‘हनुमान चालिसा वाचणे पाप आहे का?’ असे ट्विट करीत प्रश्न विचारला. (Is it a sin to read Hanuman Chalisa?)

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा देणाऱ्या आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली होती. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी त्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. माफी मागितल्याशिवाय घराबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी दिली होती.

राणा दाम्पत्यांनी (Navneet rana) रविवारी (ता. २४) मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर दोन दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झाला होता. तसेच शिवसैनिक आक्रमक झाले होते. रवी राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर दोघांची वैद्यकीय चाचणी झाली. यानंतर राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्रे न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी सुनावणी घेतली. २९ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. नियमित दंडाधिकाऱ्यांचे कोर्ट कार्यरत झाल्यावर जामिनावर सुनावणी होणार आहे. पाच दिवसांनी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: राठोड यांचा काँग्रेसवर हल्ला; महिलांच्या सन्मानासाठी ओळखले जाणारे राज्य...

आयपीसी १५३ ए नुसार कारवाई

राणा दाम्पत्यावर (Navneet rana) आयपीसी १५३ ए नुसार कारवाई केली आहे. एखादी व्यक्ती समाजात द्वेष पसरणारे वक्तव्य करते, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल आणि त्याला चिथावणी मिळेल असे कृत्य करते, त्यावेळी ही कलम लावण्यात येते. यासोबत आयपीसी ३४ आणि ३७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांनुसार आरोपीला आपण केलेली कृती समाजाच्या शांततेविरोधात आणि कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो, याची जाणीव असतानाही कृत्य केल्यास ही कलम दाखल होतात.

हनुमान चालिसा वाचणे पाप आहे का?

राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर नवनीत राणा यांनी ट्विट केले आहे. ‘हनुमान चालिसा (Hanuman chalisa) वाचणे पाप आहे का? कलम १२४ (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालिसा पाठ करणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या.’ असा प्रश्न त्यांनी ट्विचट्या माध्यमातून विचारला आहे.

Web Title: Navneet Rana Hanuman Chalisa Mumbai Matoshree

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbaitweetnavneet rana
go to top