
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सलियनचे वडील सतीश सलियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली होती. यावर आता सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.