देशात मोदी लाट अजून आहे : सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

या निवडणुकांच्या निकालांनंतर काँग्रेसने आत्मचिंतन सुरू केल्याचे संकेत शिंदे यांनी दिले.

सोलापूर : उत्तर प्रदेश व उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश पाहता देशात अद्याप मोदी लाट असल्याचेच स्पष्ट झाले आहे, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम असल्याचे मान्य केले.

कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीनंतर ते  आज (मंगळवार) येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश इतरांनी दखल घेण्यासारखेच आहे. मतदान यंत्रातील घोळाबाबतही चर्चा सुरू आहे. त्याबाबतही लवकरच स्पष्टीकरण होईल."

दरम्यान, या निवडणुकांच्या निकालांनंतर काँग्रेसने आत्मचिंतन सुरू केल्याचे संकेत शिंदे यांनी दिले. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरही पक्षामध्ये हे बदल केले जातील, असेही शिंदे म्हणाले.
 

Web Title: sushilkumar shinde acknowledges modi wave