सुषमा स्वराज यांच्या विमानाचा संपर्क तुटल्याने गोंधळ

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

एखाद्या विमानाने कोणत्याही हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर तेथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी त्या विमानाचा 30 मिनीटांपेक्षा जास्तवेळ संपर्क तुटल्यास विमान बेपत्ता झाल्याचा जागतिक संकेत आहे. असे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

नवी दिल्ली : देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज शनिवारी दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. त्रिवेंद्रम ते मॉरेशिस या प्रवासादरमन्या त्यांच्या विमानाचा संपर्क तुटल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. स्वराज या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या मेघदूत विमानाने प्रवास करत होत्या. मॉरिशसच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर अचानक त्यांच्या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. सुमारे 12 ते 14 मिनिटे विमानाशी संपर्कच होत नसल्याने सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 

एखाद्या विमानाने कोणत्याही हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर तेथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी त्या विमानाचा 30 मिनीटांपेक्षा जास्तवेळ संपर्क तुटल्यास विमान बेपत्ता झाल्याचा जागतिक संकेत आहे. असे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

स्वराज यांच्या विमानाने मॉरिशसच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर 12 मिनिट विमानाशी संपर्क न झाल्याने अथॉरिटीने धोक्याची घंटा वाजवली. या काळात विमानाशी कुठलाही संपर्क होत नव्हता. मॉरिशस हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने हे विमान शेवटचे चेन्नई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असल्याने तिथे संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच चेन्नई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने स्वराज यांच्या विमानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होत नव्हता. समुद्रामध्ये रडार नसल्यामुळे अनेकदा विमानांचा संपर्क तुटतो असे काही तज्ञांचे मत आहे.

ब्रिक्स देशांची बैठक
भारत, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) देशांची बैठक दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. यावेळी या देशांच्या मंत्र्यांमध्ये होणाऱ्या चर्चेसाठी सुषमा स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.

Web Title: Sushma Swaraj’s plane went incommunicado for 14 minutes on way to Mauritius