दहशतवादी कारवाया थांबवल्याशिवाय पाकीस्तानसोबत चर्चा नाही - सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

नवी दिल्ली - पाकीस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्याशिवाय आता त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नाही, असे केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज एका पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. पाकीस्तानशी चर्चा करण्यासाठी भारत सरकारने पाकीस्तानसमोर नमती भुमीका घेतलेच्या वृत्ताचेही त्यांनी यावेळी खंडन केले. भारत सरकार चर्चेसाठी तयार आहे. परंतु, चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळे पाकीस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्याशिवाय त्यांच्यासोबत चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

जेव्हा सीमारेषेवर तणाव असतो, जवान शहीद होत असतात तेव्हा आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करु शकत नाही. दहशतवादावर चर्चा होणं गरजेचं असल्याने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चर्चा त्यावेळी चर्चा करत असतात. आपल्या मुलभुत धोरणात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Sushma Swaraj Denies Any Talk With Pakistan