सुषमा यांचा वृद्ध महिलेस मदतीचा हात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जानेवारी 2017

अहमदाबाद: व्हिजिटिंग व्हिसाची मुदत उलटून गेल्याने अमेरिकेत पुन्हा जबरदस्तीने रवानगी होत असल्याबद्दल कैफियत मांडणाऱ्या वृद्ध महिलेच्या मदतीसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सरसावल्या आहेत. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून याप्रकरणी माहिती दिल्याबद्दल आभार मानले आहेत आणि व्हिसाबाबत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

नव्वद वर्षांच्या कांताबेन शहा यांना त्यांच्या मुलाने व्हिसाची वैधता न तपासताच अमेरिकेतून भारतात परत पाठवले आहे; परंतु, आता व्हिसाची मुदत संपल्याने त्यांना परत जाण्याबाबत सांगण्यात आले. याबाबत कांताबेन शहा यांनी पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवून माहिती दिली आणि भारतातच राहण्याची इच्छा व्यक्त केली. अखेर स्वराज यांनी कांताबेन यांच्या विनंतीची दखल घेत भारतीय व्हिसा उपलब्ध करून देण्याबाबत सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. स्वराज यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना कांताबेन यांचा मुलगा जयेश शहा म्हणाले की, परराष्ट्रमंत्र्यांनी आईला आश्‍वासन दिल्याने केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याबाबत आशावादी असल्याचे म्हटले आहे. कांताबेन या गेल्यावर्षी 15 नोव्हेंबरला अहमदाबादला आल्या होत्या. त्यांच्याकडे 5 वर्षांचा व्हिजिटिंग व्हिसादेखील असून, त्याची मुदत 15 ऑगस्ट 2016 ला संपली आहे; परंतु या व्हिसाची वैधता न तपासताच त्या भारतात आल्या होत्या. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी व्हिसाच्या नियमानुसार 72 तासांत अमेरिकेला परत जाण्याचे सांगितले आहे. कांताबेन यांनी मात्र आपले उर्वरित आयुष्य भारतातच घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: Sushma Swaraj helps women