
मोठा दिलासा! मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाची चाचणी निगेटिव्ह
नवी दिल्ली : देशासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद एक संशयित रुग्ण आढळून आला होता. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचं एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. त्यामुळं देशात मंकिपॉक्सचा अद्याप शिरकाव झालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (suspected case of monkeypox from Ghaziabad has tested negative)
एएनआयच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं आढळलेला संशयित मंकीपॉक्सच्या रुग्णाचे नमुने पुण्यातील आयसीएमआर-एनआयव्हीला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्याचा अहवाल निगेट्विह आला आहे.
हेही वाचा: Prophet Remark: आता तालिबाननं भारताला धर्मांधतेवरुन झाडलं लेक्चर!
दरम्यान, केंद्र सरकारनं या आजारासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. देशात संशयित रुग्ण आढळल्यावर त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे (NIV) पाठवले जातील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. हे नमुने एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाअंतर्गत पाठविले जातील. तसेच अशी प्रकरणं संशयास्पद मानली जातील, ज्यामध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ज्याचा गेल्या 21 दिवसांत मंकीपॉक्स प्रभावित देशांमध्ये प्रवासाचा इतिहास आहे. त्याशिवाय ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास अशा रुग्णाला हॉस्पिटलच्या आयसोलेशन रूममध्ये किंवा घरातील वेगळ्या खोलीत ठेवण्यात येईल. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालावा लागेल. रुग्णाच्या अंगावीरल सर्व पुरळ बरे होईपर्यंत आयसोलेश चालू राहील. यासोबतच संशयित किंवा रुग्णाचे संपर्क ट्रेसिंग केले जाईल, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: Rajya Sabha Election : 'सपा'नं वाढवलं CM उद्धव ठाकरेंचं टेन्शन!
दरम्यान, यापूर्वी म्हणजेच 20 मे रोजी केंद्र सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांवर आणि प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने विमानतळं, बंदरं यांचा समावेश होता. याशिवाय दक्षिण अफ्रिकेतून भारतात दाखल होणाऱ्या आणि ज्या प्रवाशांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत, अशा प्रवाशांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Web Title: Suspected Case Of Monkeypox From Ghaziabad Has Tested Negative
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..