जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

चंदीगढ: भारतीय लष्करातील जवानांना मिळणाऱया निकृष्ठ जेवणाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करणारे जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

तेज बहादूर यादव यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांना सीमा सुरक्षा दलातून निलंबीत करण्यात आले होते. तेज बहादूर यादव यांचा 22 वर्षीय मुलगा रोहित गुरुवारी (ता. 17) रात्री राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची माहिती दिली आहे.

रोहित दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत होता. नुकताच तो घरी आला होता. रोहितचे वडील तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. रोहितची आई गुरुवारी संध्याकाळी कार्यालयातून घरी परतली. त्यावेळी रोहितची खोली बंद होती. अनेकदा प्रयत्न करुनही दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी त्याची खोली आतमधून बंद होती. खोली उघडल्यावर रोहित पलंगावर मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या हातात एक पिस्तूल होते. त्याचे वडील कुंभमेळ्याला गेले असून, त्यांना आम्ही या घटनेची माहिती दिली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.'

Web Title: Suspended BSF jawan Tej Bahadur Yadavs son found dead