

Suspended DSP Bheem Reddy Faces Probe Over Rs 300 Crore Assets
Esakal
तेलंगणातील निलंबित डीएसपी संकीरेड्डी भीम रेड्डी यांच्या कथित बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने (ACB) तपास आणखी तीव्र केलाय. भीम रेड्डी यांच्याशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या आठ कथित बेनामीदारांची ACBने ओळख पटवली आहे. त्यांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू आहे. हैदराबादमधील पुप्पलागुडा आणि इतर भागांत ही कारवाई सुरू आहे. छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याची माहिती समोर आलीय. संपत्तीची मालकी आणि पैशांचा व्यवहार नेमका कसा झाला याचा तपास ACBकडून केला जातोय.