संशयित पाकिस्तानी नौका घेतल्या ताब्यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

चंडीगड- गुजरातच्या कच्छमधील सर क्रीकच्या भागात संशयित पाकिस्तानी नौका भारताने गुरुवारी ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये दहशतवाद्यांचा हात आहे का याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

भारतीय लष्कराने मच्छिमारीची साधनेही या नौकांमधून जप्त केली आहेत. दरम्यान, या प्रकरणात अद्याप मच्छिमार अथवा इतर कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान असलेल्या वाढत्या तणावामुळे भारताने सुरक्षा वाढविली आहे. सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी पंजाबमधील टोटा सीमेवरील ठाण्याजवळ दोन पाकिस्तानी नौका ताब्यात घेतल्या होत्या. याच भागातून सीमा सुरक्षा दलाने ऑक्टोबरमध्येही पाकिस्तानी नौका ताब्यात घेतली होती. ती नाव रिकामीच होती. समुद्राची पाणीपातळी वाढल्याने नाविकासह ती वाहून आली होती. 
 
Web Title: Suspicious Pakistan fishing boats seized in Gujarat's Sir Creek