

BJP leader Suvendu Adhikari’s aide Chandranath Rath was shot dead in Madhyamgram, triggering political outrage and emotional reactions from his family.
esakal
भाजप नेते व विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली. निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या ४८ तासांत घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. हल्लेखोरांनी पूर्व नियोजन केल्याचे पुरावे समोर आले आहेत. मात्र आता चंद्रनाथ रथ यांच्या आई हसिराणी रथ यांनी यावर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.