esakal | स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ

स्वच्छ भारत मिशन शहरी २.० आणि अटल मिशन २.० अंतर्गत सर्व शहरांना कचरामुक्त कऱणे आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन करणे हा उद्देश आहे.

स्वच्छ भारत मिशन 2.0 मोहिमेचा PM मोदींनी केला शुभारंभ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्वच्छ भारत मिशन नागरी २.० मोहिमेचा शुभारंभ केला. यासोबतच मोदी अटल मिशन २.० (AMRUT 2.0) या मोहिमेचासुद्धा शुभारंभ करण्यात आला. दोन्ही मोहिमांचा शुभारंभ कार्यक्रम सुरु असून यासाठी मोदी पोहोचले आहेत. स्वच्छ भारत मिशन शहरी २.० आणि अटल मिशन २.० अंतर्गत सर्व शहरांना कचरामुक्त कऱणे आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन करणे हा उद्देश आहे.

स्वच्छ भारत मिशन नागरी २.० आणि अटल मिशन २.० या दोन्ही मोहिमेंतर्गत देशात वेगाने शहरीकरणामध्ये येणाऱ्या आव्हानांवर उपाय योजनाच्या दिशेने काम केले जाणार आहे. मोदींसोबत यावेळी मंत्री हरदीप सिंह पुरी आणि राज्यांसह केंद्र शासित प्रदेशाचे नगर विकास मंत्रीसुद्धा उपस्थित आहेत. या दोन्ही प्रमुख मोहिमेतून नागरिकांना पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या मुलभूत सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा: Air India ची मालकी टाटा समूहाकडे? डिसेंबरपर्यंत घोषणा

काय आहे स्वच्छ भारत योजना नागरी 2.0 (SBM-U 2.0)

स्वच्छ भारत योजना नागरी भाग 2.0 या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे सर्व शहरे कचरामुक्त करणे आणि अमृतयोजने अंतर्गत न येणाऱ्या सर्व शहरांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन , सर्व शहरी स्थानिक आस्थापना हागणदारी मुक्त प्लस म्हणजेच ओडीएफ+ आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागांना ओडीएफ++ करून त्याद्वारे शहरी भाग स्वच्छ आणि सुरक्षित करणे हे आहे. घनकचऱ्याचे जागच्याजागी वर्गीकरण, कमी वापर, पुनर्वापर, पुनरुज्जीवन या तीन तत्त्वांचा उपयोग, सर्व प्रकारच्या कचऱ्यावर वैद्यानिक प्रकारे प्रक्रिया, आणि परिणामकारक घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पारंपारिक कचरा पट्ट्यांचे रुपांतरण अशा अनेक बाबी या मोहिमेच्या उद्दिष्टात समाविष्ट आहेत. स्वच्छ भारत योजना नागरी 2.0(SBM-U 2.0) साठीचा साधारण 1.41 लाख कोटी रुपये एवढा खर्च आहे.

काय आहे अटल भारत योजना-नागरी (अमृत 2.00)

अमृत 2.00 ही योजना साधारणपणे 4700 स्थानिक स्वराज्य संस्थामधील सर्व घरांमध्ये 2.68 कोटी नळ जोडण्या देऊन 100% पाणीपुरवठा करणार आहे. तसेच 500 शहरांमध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या 2.64 कोटी जोडण्या पुरवणार आहे. यामुळे नागरी भागातील 10.5 कोटींहून अधिक लोकांना याचा फायदा होईल. अमृत 2.00 मध्ये चक्राकार अर्थव्यवस्थेची तत्वे स्वीकारली आहेत तसेच ही योजना पृष्ठभागावरील तसेच भूगर्भातील पाणी साठ्यांचे संवर्धन आणि संरक्षण याला चालना देणारी योजना आहे. ही योजना पाणी व्यवस्थापनात माहितीआधारित प्रशासन, त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्याचा वापर याला महत्व देते. शहरांमध्ये प्रगतिशील स्पर्धा वाढीस लागावी म्हणून पेयजल सर्वेक्षण सुद्धा करण्यात येणार आहे AMRUT 2.0 या योजनेचा खर्च 2.87 लाख कोटी आहे.

loading image
go to top