
Delhi Police taking Swami Chaitanyanand Saraswati into custody after sexual exploitation allegations by multiple students.
esakal
Summary
स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला पटियाला हाऊस कोर्टाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.
ईडब्ल्यूएस शिष्यवृत्तीअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना लक्ष्य करून दबाव आणला जात होता.
दिल्लीतील वसंत कुंज आश्रमाचा संचालक बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला पटियाला हाऊस कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. चैतन्यानंद सरस्वतीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिस आरोपी बाबा चैतन्यानंद सरस्वती यांची चौकशी करणार आहेत. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी बाबाची पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. त्याने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत.