esakal | टीएमसी-काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपा खासदाराचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

dasgupta

टीएमसी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दासगुप्ता यांच्या उमेदवारीचा विरोध दर्शवला होता.

टीएमसी-काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपा खासदाराचा राजीनामा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

West Bengal Assembly Election 2021 : कोलकाता -  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येथील तारकेश्वर विधानसभा जागेवरील भाजपा उमेदवार स्वपन दासगुप्ता यांनी आपल्या राज्यसभा पदाचा राजीनामा दिला आहे. टीएमसी आणि काँग्रेसच्या आरोपानंतर दासगुप्ता यांनी आपला राजीनामा दिला आहे. स्वपन दासगुप्ता भाजपाचे राज्यसभा सदस्य आहेत.  टीएमसी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दासगुप्ता यांच्या उमेदवारीचा विरोध दर्शवला होता.  टीएमसी आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या मते दासगुप्ता यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं. कारण, ते विधानसभा निवडणूकीत उतरले आहेत. 

राज्यसभेतील विरोधीपक्ष काँग्रेसनं सभापती व्यंकैया नायडू यांच्याकडे दासगुप्ता यांच्या या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं होतं. काँग्रेस नेते जयराम रमेशा यांनी नायडू यांना पत्र पाठवत दासगुप्ता यांच्या विधानसभा उमेदरीवरुन स्पष्टीकरण मागवलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलेलं की, राज्यसभा सदस्यत्वचा राजीनामा देण्यापूर्वी दासगुप्ता यांनी एखाद्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज कसा दाखल केला.

पश्चिम बंगालमध्ये सहा एप्रिल रोजी होणऱ्या तिसऱ्या टप्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २६ उमेदवाराची यादी जाहीर केली होती. यामध्ये स्वपन दासगुप्ता यांच्या नावाचाही समावेश होता.  यावरुन टीएमसी आणि काँग्रसनं भाजपा आणि दासगुप्ता यांना कात्रीत पकडलं होतं. टीएमसी खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या की,  दासगुप्ता यांनी भारतीय संविधानाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला.  
 

loading image