Swati Maliwal Assault Case : मालीवाल मारहाण झाली 'त्या' दिवशी तक्रार न देता पोलिस स्टेशनमधून का परतल्या? स्वतःच सांगितलं कारण

Swati Maliwal Assault Case : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यातही पोहोचल्या होत्या, मात्र कोणतीही लेखी तक्रार न देता त्या तेथून परतल्या.
Swati Maliwal Assault Case
Swati Maliwal Assault CaseEsakal

Swati Maliwal Assault Case: आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ही घटना 13 मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्येही पोहोचल्या होत्या, मात्र कोणतीही लेखी तक्रार न देता त्या तेथून परत आल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांनी पोलिस त्यांच्या घरी गेले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली.

दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी 13 मे रोजी लेखी तक्रार न देता परत का गेल्या, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता त्यांनीच उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितले की, पोलिस स्टेशनमध्ये जाताच त्यांना खूप फोन येऊ लागले. यामुळे त्या इतक्या घाबरल्या की त्या तक्रार न करता परत आल्या.

'राजकीय मुद्दा बनवायचा नव्हता'

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, मी पोलीस स्टेशनमध्ये असताना मला अनेक माध्यमांचे कॉल्स आले. मला इतके मीडिया कॉल्स येताच मी घाबरून गेलो. मला वाटले की, आता तक्रार केली तर बरीच माध्यमे येतील. मला तो राजकीय मुद्दा बनवायचा नव्हता आणि दुसरे म्हणजे मला खूप वेदना होत होत्या. म्हणून तिथून उठून घरी आले. यासंबधीचे वृत्त livehindustan या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Swati Maliwal Assault Case
Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

स्वाती मालीवाल यांनी आपल्या तक्रारीत बिभववर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, 13 मे रोजी त्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलल्या असताना बिभव यांनी कोणतीही चिथावणी न देता त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण आणि लाथा दिल्या. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत बिभव यांना अटक केली असून आता बिभव ४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

बिभव कुमार यांनी जामीन अर्ज केला दाखल

दुसरीकडे बिभव कुमार यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितले आहे. शुक्रवारी बिभव कुमार यांना चार दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर, त्याच्या वकिलांनी याचिका दाखल केली.

Swati Maliwal Assault Case
Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com