
Swearing In Ceremony : योगी यांच्या नावावर ४ विक्रम; खास रेकॉर्ड
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले आहेत. योगी यांनी दुपारी ४.१५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजधानी लखनऊमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेऊन इतिहास रचला. त्यांच्या नावावर चार विक्रम झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५० हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथेसोबतच योगी आदित्यनाथ यांच्या नावावर उत्तर प्रदेशचे अनेक खास रेकॉर्डही नोंदवले गेले आहेत.
हेही वाचा: साबरमती आश्रमातील बांधकामाला महात्मा गांधींच्या पणतूचा विरोध
३७ वर्षांत सत्तेत परतणारे पहिले मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे उत्तर प्रदेशात ३७ वर्षांत सत्तेत परतणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. योगींच्या आधी काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी यांनी १९८५ मध्ये हा पराक्रम केला होता. ते अविभाजित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सलग दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तिवारी यांच्या कार्यकाळानंतर दुसरा कोणताही मुख्यमंत्री सत्तेत परतण्यात यशस्वी झाला नाही.
सलग दुसऱ्यांदा सत्ता घेतली हाती
एनडी तिवारींपूर्वी इतर तीन मुख्यमंत्रीही सत्तेत परतले होते. १९५७ मध्ये संपूर्णानंद, १९६२ मध्ये चंद्रभानू गुप्ता आणि १९७४ मध्ये हेमवती नंदन बहुगुणा सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनण्यात यशस्वी ठरले. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) पाचवे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सलग दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतली आहे.
हेही वाचा: काँग्रेसमध्ये कलह! सोनिया गांधींकडे कमलनाथ यांची तक्रार
पुनरागमन करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या आधी कल्याण सिंह, राम प्रकाश गुप्ता आणि राजनाथ सिंह मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, यापैकी कोणालाही सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आली नाही. योगी हे उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) भाजपचे (BJP) पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
१५ वर्षांनी मुख्यमंत्री आमदार झाले
उत्तर प्रदेशमध्ये १५ वर्षांनंतर विधानसभेचा सदस्य मुख्यमंत्री झाला आहे. योगी गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते लोकसभेचे सदस्य होते. लोकसभेचे सदस्यत्व सोडल्यानंतर ते विधान परिषदेचे सदस्य झाले. योगींच्या आधी अखिलेश यादव आणि मायावतीही आमदार म्हणून मुख्यमंत्री झाले.
Web Title: Swearing In Ceremony 4 Records In The Name Of Yogi Adityanath Uttar Pradesh Lucknow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..