टी. एन. शेषन अनंतात विलीन

पीटीआय
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (ता. १०) रात्री त्यांचे निधन झाले होते. शेषन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी, ‘द्रमुक’चे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

चेन्नई - माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (ता. १०) रात्री त्यांचे निधन झाले होते. शेषन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी, ‘द्रमुक’चे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

शेषन यांनी अत्यंत एकनिष्ठतेने देशाची सेवा केली. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या निधनाने खूप दुःखी झालो आहे, ओम शांती.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शेषन यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या बळकटीकरणासाठी आणि दूरगामी निवडणूक सुधारणांसाठी अग्रणी म्हणून काम केल्याबद्दल त्यांचे कायम स्मरण राहील.
- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा

शेषन हे एक महान व्यक्ती होते. निवडणूक आयोगासाठी ते कायमच प्रेरणादायी आहेत. 
- शेफाली शरण, निवडणूक आयोगाच्या प्रवक्‍त्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: t n seshan Funeral