२६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. या हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा यानं राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे हल्ल्याची कबुली दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपण पाकिस्तानी एजंट असल्याचं त्याने तपास यंत्रणांना सांगितलं आहे. तसेच हल्ल्यावेळी आपण मुंबईत होतो आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची रेकी केली, असा खुलासाही त्याने तपासादरम्यान केल्याचं समोर आलं आहे.