ताजमहाल मुघलांचा नाही तर आमच्या पूर्वजांचा वारसा; भाजपच्या खासदाराचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taj Mahal is not the heritage of the Mughals but of our ancestors

ताजमहाल मुघलांचा नाही तर जयपूर घराण्याचा वारसा; भाजप खासदाराचा दावा

ताजमहाल (Taj Mahal) हा मुघलांचा नसून आमच्या पूर्वजांचा वारसा आहे. ताजमहाल ही आमची संपत्ती आहे. ताजमहालाची जमीन आमच्या पूर्वजांची होती. आमच्या पोथीखान्यात जमिनीशी संबंधित कागदपत्रे ठेवली आहेत. जमीन आमची होती. परंतु, सत्ता मुघलाची होती. त्यांनी जमीन घेतली आणि ताजमहाल बांधला. कदाचित त्यांना ती जमीन आवडली असेल, असा दावा राजस्थानच्या राजसमंदच्या भाजप खासदार दिया कुमारी (Diya Kumari) यांनी केला. (Taj Mahal is not the heritage of the Mughals but of our ancestors)

वाराणशीतील ज्ञानवापी मशीद-काशी विश्वनाथ मंदिराबाबत सुरू असलेल्या वादात आता आग्राचा ताजमहालही (Taj Mahal) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलीकडेच ताजमहाल संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. आजही सरकारने कोणतीही जमीन संपादित केली तर त्या बदल्यात नुकसान भरपाई दिली जाते. त्याच्या बदल्यात नुकसान भरपाई दिल्याचे मी ऐकले आहे, असेही भाजप खासदार दिया कुमारी (Diya Kumari) म्हणाल्या.

हेही वाचा: वारांगनांसाठी नवा कायदा लागू; या देशाने दिली मान्यता

त्यावेळी त्याच्याविरुद्ध अपील करण्याचा किंवा त्याच्याविरुद्ध काहीही करण्याचा कायदा नव्हता. आता कोणीतरी आवाज उठवला आणि कोर्टात याचिका दाखल केली हे बरे झाले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अयोध्या मंदिरादरम्यान रामाच्या वंशजांचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हाही जयपूर राजघराण्याने ते रामाचे वंशज असल्याचा दावा केला होता. यासाठी ते न्यायालयात साक्ष देण्यासाठी तयार आहे.

...तरच तथ्य समोर येईल

ताजमहाल (Taj Mahal) पाडा असे मी म्हणणार नाही. परंतु, त्याच्या खोल्या उघडल्या पाहिजेत. ताजमहालमधील काही खोल्या बंद आहेत. काही भाग बऱ्याच काळापासून बंद आहेत. त्याची चौकशी करून ते उघडले पाहिजे. जेणेकरून तेथे काय होते आणि काय नाही हे कळू शकेल. एकदा योग्य तपास केल्यावरच हे सर्व तथ्य समोर येईल, असेही भाजप (Bjp) खासदार दिया कुमारी (Diya Kumari) म्हणाल्या.

Web Title: Taj Mahal Is Not The Heritage Of The Mughals But Of Our Ancestors The Claim Of The Princess Of Jaipur Diya Kumari Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpheritageAgra Taj Mahal
go to top