Taj Mahal Protection: ताजमहालच्या संरक्षणासाठी उभारले जातेय हिरवेगार सुरक्षा कवच, धूळ व प्रदूषणावर मिळणार नियंत्रण

Taj Mahal Protection Drive Focuses on Green Cover and Clean Air: ताजमहालच्या संरक्षणासाठी मोठी तयारी; धूळ आणि प्रदूषण रोखण्यासाठी उभारणार हिरवेगार कवच
Green Safety Cover Planned Around Taj Mahal to Reduce Dust and Pollution and Protect the Iconic UNESCO World Heritage Site

Green Safety Cover Planned Around Taj Mahal to Reduce Dust and Pollution and Protect the Iconic UNESCO World Heritage Site

esakal

Updated on: 

जगप्रसिद्ध ताजमहालचे धूळ आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी आग्रा किल्ला आणि ताजमहाल यांच्यामधील ऐतिहासिक ताज हेरिटेज कॉरिडोर परिसरात हरित पट्टा विकसित केला जात आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि राज्याच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून या परिसरात उद्याने आणि हिरवळ तयार करण्याचे काम सुरू आहे. यमुना नदीच्या काठावरील सुमारे ४० हजार चौरस मीटर अविकसित जागेवर आग्रा विकास प्राधिकरणाच्या (ADA) निधीतून उद्यान उभारले जात आहे.

ताजमहालच्या परिसरात हिरवळ वाढवून धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षक परिसर विकसित होणार आहे.

Loading content, please wait...