esakal | 'ताजमहल हा तर राममहल, योगी शिवरायांचेच वंशज', भाजप आमदार सुसाट
sakal

बोलून बातमी शोधा

taj mahal aditynath

त्यांनी म्हटलंय की, ताजमहल हे आधी एक शिवमंदिर होतं जे उद्ध्वस्त करुन ताजमहल बनवण्यात आलं. 

'ताजमहल हा तर राममहल, योगी शिवरायांचेच वंशज', भाजप आमदार सुसाट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलियामधील बैरिया मतदार संघातून आमदार असलेले सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अधूनमधून अशी वक्तव्ये केल्याने ते सातत्यांने चर्चेत असतात. आणि आता सध्या ते आणखी एका वक्तव्यासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी आता मागणी केलीय की, ताजमहलचे नाव बदलून राममहल करावे. कारण ताजमहल हे आधी एक शिवमंदिर होतं जे उद्ध्वस्त करुन ताजमहल बनवण्यात आलं. 

योगी सरकार बदलणार ताजमहलचं नाव
आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं की, ज्या जागेवर आज ताजमहल उभा आहे त्या जागी आधी शिव मंदिर होतं. मुघल काळात याचा पाडाव झाला. पुढे त्यांनी असा दावा केला की, योगी सरकार लवकरच ताजमहलचं नाव बदलून राममहल असं करणार आहे. त्यांनी असा देखील दावा केला की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवाजीचे वंशज उत्तर प्रदेशच्या धरतीवर आले आहेत. ज्याप्रकारे समर्थ रामदासांनी शिवाजीला भारत दिला होता, त्याचप्रमाणे गोरखनाथ यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश दिला आहे. 

हेही वाचा - कमल हसन यांच्या गाडीवर युवकाचा अयशस्वी हल्ला; कार्यकर्त्यांनी केली मारहाण

राष्ट्रविरोधी मानसिकतेच्या लोकांना प्राथमिकता नाही
त्यांनी पुढे म्हटलं की, राष्ट्रविरोधी मानसिकतेच्या लोकांना भाजप सरकारमध्ये कसल्याही प्रकारची प्राथमिकता दिली जाणार नाही. केवळ तेच लोक जे भारत आणि भारतीयत्वाचा गर्व बाळगतात तेच इथे नेते बनू शकतात. सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. याआधी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणावर त्यांनी म्हटलं होतं की, मुलींना जर संस्कार शिकवले गेले तर त्यांच्यावरचे बलात्कार रोखले जाऊ शकतात. 

loading image