भाजप नेत्यांकडे 6 महिन्यांचा हिशेब मागा: केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे केवळ 8 नोव्हेंबरनंतरचा नव्हे तर गेल्या सहा महिन्यातील हिशेब मागायला हवी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे केवळ 8 नोव्हेंबरनंतरचा नव्हे तर गेल्या सहा महिन्यातील हिशेब मागायला हवी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि खासदारांना 8 नोव्हेंबर नंतरच्या व्यवहारांची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे देण्याची सूचना केली आहे. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. "तर आता भाजपच्या आमदार आणि खासदारांना बॅंकेची माहिती देणे आवश्‍यक आहे आणि अमित शाह काळ्या पैशाची तपासणी करणार? पण त्यांनी आठ नोव्हेंबरपूर्वीच पैशांची विल्हेवाट लावली आहे. आठ नोव्हेंबरपूर्वीचीच माहिती का? कृपया 8 नोव्हेंबरपूर्वीच्या सहा महिन्याची माहिती मागा. याशिवाय मोदीजींनी त्यांचे मित्र अंबानी, अदानी, पेटीएम, बिगबाजार यांचीही खाती तपासावीत' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच बिगबाजारवर टीका करत "एटीएम रिकामी आहेत. मोदी सरकार बिगबाजारला नोटा पाठवत आहे. का? चलन एटीएमकडे पाठवावे की बिगबाजारकडे?' असे प्रश्‍नही केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.

सोमवारी केजरीवाल यांनी "मोदी यांच्या अहंकारामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. केवळ 20 दिवसात देश 10 वर्षे मागे गेला आहे', अशी टीका केली होती.

Web Title: Take BJP leaders bank details of previous 6 months: Kejriwal