
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. ५) उष्णतेची लाट (heat wave) व्यवस्थापन आणि मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) उष्णतेची लाट किंवा आगीच्या घटनांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या गरजेवर भर दिला. (Narendra Modi said, Take measures to prevent deaths due to heat waves and fires)
बैठकीत भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांनी मे २०२२ मध्ये देशभरात उच्च तापमान (heat wave) राहणार असल्याची माहिती दिली, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. उष्णतेची लाट किंवा आगीच्या घटनांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आपण सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा कोणत्याही घटनेचा प्रतिसाद वेळ खूप कमी असावा, असे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांचे नियमित फायर सेफ्टी ऑडिट करण्याची गरज आहे. उन्हाळा (Summer) आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य संस्थांमध्ये प्रभावी समन्वयाची गरज आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मानक प्रतिसाद म्हणून राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर उष्मा कृती योजना तयार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.